महत्वाच्या बातम्या

 जाणता राजा महानाट्याच्या तयारीला वेग : जिल्ह्यात १७ ते १९ दरम्यान जानेवारीला तीन दिवस प्रयोग


- रेल्वे ग्राऊंडवर होणार महानाट्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा प्रशासनामार्फत १७, १८व १९ जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार आहे. या महानाट्यासाठीच्या तयारीला वेग आला असून या संदर्भात तयारीला सुरुवात झाली असून आज याबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बैठक घेतली.यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी लीना फलके , स्थानिक समन्वयक आनंद जावडेकर उपस्थित होते .

या महानाट्यासाठी स्टेज, व अन्य अनुषंगिक व्यवस्था यांचा आढावा त्यांनी घेतला.इतिहासकार शिवशाहीर  बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग रेल्वे ग्राऊंडवर  होणार आहे.

३५०  व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून होणार आहे.

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील दुसरा प्रयोग भंडारा येथे होत आहे.

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग जाणता राजा मध्ये दाखविण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व नगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले  आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. दररोज  सायंकाळी पाच वाजतानंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट, घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण  कलाकार करणार आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos