भारतात दर दोन मिनिटांनी होतो सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू, गेल्या वर्षी सुमारे आठ लाख वीस हजार अर्भक मृत्यूची नोंद


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  भारतात दर दोन मिनिटांनी सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू होतो, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या बालमृत्यूदरासंबंधात काम करणाऱ्या आंतरसंस्थांच्या गटाने (यूएनआयजीएमई) दिला आहे. पाणी, स्वच्छतेच्या सुविधा, पोषणमूल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधा यांच्या अभावामुळे हे मृ्त्यू ओढवतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
भारतात गेल्या वर्षी सुमारे आठ लाख वीस हजार अर्भक मृत्यू नोंदिवण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांमधील हा नीचांकी दर आहे. तरीही ही संख्या जगाच्या तुलनेत पहिल्या क्रमांकाची आहे. चीनमध्येही अर्भकमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी सुमारे तीन लाख तीस हजार अर्भकमृत्यू झाले. 
भारतात दर वर्षी दोन कोटी ५० लाख अर्भके जन्माला येतात. या तुलनेत गेल्या पाच वर्षांत बालमृत्यूदर खाली आला आहे. जगात जन्माला येणाऱ्या मुलांपैकी १८ टक्के मुले भारतात जन्म घेतात, असे जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य प्रमुख डॉ. गगन गुप्ता यांनी म्हटले. पाच वर्षांखालील अर्भकांच्या मृ्त्यूचे प्रमाण हे गेल्या वर्षी प्रथमच जननदराच्या प्रमाणात आले आहे. आता पुढील पाऊल म्हणजे मृत्यूचे प्रमाण रोखणे, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. नवजात अर्भकांसाठी देशभरात विशेष देखभाल केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सातत्याने लसीकरणाच्या मोहिमा राबविण्यात येत आहेत, अशी माहिती युनिसेफच्या प्रतिनिधी यास्मिन अली हक यांनी दिली. या प्रयत्नांमुळे २०१६ च्या (आठ लाख ६७ हजार) २०१७मध्ये (आठ लाख दोन हजार) बालमृ्त्यूचे प्रमाण खाली आले आहे. मुलींच्या मृ्त्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे. 
भारतात गेल्या वर्षी नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण सहा लाख पाच हजार नोंदविण्यात आले. पाच ते १४ या वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण एक लाख ५२ हजार आहे. गेल्या वर्षी १५ वर्षांखालील सहा लाख ३० हजार मुले मृत्युमुखी पडली. याचाच अर्थ प्रत्येक पाच सेकंदाला एक मुलगा मृत्यू पावला. पाच वर्षांकालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या खाली आले आहे.   Print


News - World | Posted : 2018-09-19


Related Photos