श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी मार्कंडादेव येथे भाविकांची गर्दी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज १२ ऑगस्ट  रोजी श्रावण महिन्यातील दुसर्या सोमवारी भाविकांनी विदर्भाची काशी मार्कंडादेव येथे गर्दी केली आहे. सकाळपासूनच भाविकांनी पुजा - अर्जा करण्यासाठी रांगेत उभे राहून मनोभावे पुजा केली.
श्रावण महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात तिर्थस्थळी जात असतात. भगवान शंकराला बेल, फुल अर्पण करून मनोकामना करतात. मार्कंडादेव येथेही दूरदूरवरून भाविक येत आहेत. मागील सोमवारपासून भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. यामुळे भाविकांना व्यवस्थीत दर्शन घेता यावे याकरीता रांगेत लावण्यासाठी सोय करण्यात आली आहे. आज भाविकांची सकाळपासूनच प्रचंड गर्दी होती. संपूर्ण श्रावण महिना मार्कंडादेव येथे भाविकांची रेलचेल राहणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-12


Related Photos