महत्वाच्या बातम्या

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नोडल अधिकाऱ्यांचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आगामी काळामध्ये लोकसभा निवडणूक होणार असून निवडणूक कामकाजासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नोडल अधिकाऱ्यांचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीसाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. निवडणुकीच्या वेळेस नेमणुकांमध्ये बदल करणे, जागा बदलून मागणे, दिलेल्या जागेवर काम करण्यास असमर्थता दर्शविणे, आरोग्याचे वेगवेगळे कारण सांगणे, अशा प्रकारचे अनेक अर्ज कर्मचाऱ्यांकडून येत असतात. त्यामुळे कार्यालय प्रमुखांनी अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती देतांना शहानिशा करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

मतदार जनजागृती करणे आवश्यक असून स्वीपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारांची संख्या वाढविणे यासाठी महाविद्यायामध्ये ईव्हीएम प्रात्याक्षिक, पथनाट्य व लोककलेच्या माध्यमातून तरुणांमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

निवडणुकीच्या काळामध्ये समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश, जाहिराती तसेच विविध माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सायबर विभागाने सज्ज रहावे, त्याअनुषंगाने सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सायबर विभागाला दिल्या.

आगामी लोकसभा निवडणूक कामकाजाच्या संदर्भात वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे. मुनष्यबळ उपलब्धता, प्रशिक्षण, साहित्य उपलब्धता व वाटप, वाहने, सायबर विभाग, स्वीप, निवडणूक खर्च, पोस्टल बॅलेट, ईव्हीएम मॅनेजमेंट, कायदा व सुव्यवस्था, मीडिया सेल, तक्रार निवारण आदींचा सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.





  Print






News - Wardha




Related Photos