भामरागड मधील पुरस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी वेळ लागणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुका मुख्यालयाचा जगाशी संपर्क तुटलेलाच असून भामरागड मधील स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही तासांचा वेळ लागणार आहे. सध्या काही प्रमाणात पाणी ओसरला असून अजूनही काही घरांमध्ये पाणी आहे.
काल ८ ऑगस्ट रोजी अनेक घरे पाण्याखाली गेली होती. जवळपास ३५० कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्यांची व्यवस्था शाळा, पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये करण्यात आली होती. पोलिस विभाग, महसूल विभागाच्या वतीने गस्त केली जात आहे. नागरीकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे कचरा सुध्दा मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. आज दुपारपर्यंत काही प्रमाणात पूर ओसरला. मात्र पुलावरील पाणी रात्री उशिरापर्यंत उतरण्याची शक्यता आहे. सध्या पाउस थांबला असला तरी भामरागड नजीकच्या नद्याचा पूर ओसरायला वेळ लागत आहे. यामुळे नागरीकांना अजूनही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-09


Related Photos