महत्वाच्या बातम्या

 सरकारचा नवा नियम : फोन कॉल करुन त्रास देणाऱ्यांना भरावा लागेल ५० हजारांचा दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : आजच्या काळात जवळपास प्रत्येकजण फोनचा वापर करतो. अशा वेळी आपला नंबर चुकीच्या व्यक्तीकडे गेला तर आपल्याला वारंवार फोन करुन त्रासही होतो. अशा लोकांसाठी सरकारने नवा नियम आणला आहे.

कोणी विनाकारण फोन करुन तुम्हाला त्रास देत असेल तर ५० हजारांपासून २ लाखांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो. केंद्राच्या मोदी सरकारकडून नवीन टेलिकॉम बिल आणले गेले आहे. ज्यामध्ये विविध नियमांचे उल्लंघन आणि ५० हजार रुपयांपासून २ लाख रुपयांपर्यंत दंड लावला जाईल.

मोबाईल यूझर्सला दिलासा मिळणार -

तुम्ही नको असलेल्या कॉल्समुळे त्रासलेले असाल, तर तुमच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे. कारण नवीन विधेयकामुळे नको असलेले कॉल्स थांबण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही वर्षांत नको असलेल्या कॉलच्या संख्येत वाढ झाली आहे. यात प्रमोशन आणि बँक कॉलमध्ये वाढ झाली आहे. यासाठी ट्रायने अनेक सूचना दिल्या आहेत. मात्र, दूरसंचार कंपन्यांकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. अशा परिस्थितीत सरकारने कठोरपणा दाखवत नव्या टेलिकॉम बिलमध्ये दंडाची तरतूद केली आहे. अशा परिस्थितीत नको असलेल्या कॉल्सपासून आपली सुटका होईल, अशी आशा आहे. यापूर्वी, ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना एआय फिल्टरच्या मदतीने फसवणूक आणि अनोळखी कॉल्स थांबवण्याचे निर्देश दिले होते.

नियमांमध्ये कठोरता आणि हलगर्जीपणा -

नवीन टेलिकॉम बिलमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिलासा देत दंडाची रक्कम ५ हजारांवरुन ५० हजारांवर आणली आहे. याशिवाय ग्राहकांवरील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. याशिवाय ओटीटीसाठी नियमही निश्चित करण्यात आले आहेत.





  Print






News - World




Related Photos