महत्वाच्या बातम्या

 जिजाऊ को.ऑप. बँकेच्या कर्जवाटप प्रकरणी चौकशीअंती कारवाई : मंत्री दिलीप वळसे पाटील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केल्या प्रकरणी सहकार आयुक्तांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जि. अमरावती यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

या संदर्भात सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

यावेळी वळसे पाटील म्हणाले, जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक, अमरावती या बॅकेबाबतच्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी १० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये तपासणीसाठी प्रादेशिक उपसंचालक, (साखर), अमरावती यांची नियुक्ती केली असून त्यांनी १८ ऑगस्ट २०२३ रोजी तपासणी अहवाल सादर केला आहे. 

या अहवालामध्ये कर्ज मंजूर प्रकरणांमध्ये पुरेसे तारण न घेणे, कर्जदाराची क्षमता न पाहता कर्ज देणे, संपूर्ण कर्ज रक्कम उचल देणे, कमी व्याजदराने कर्ज मंजूर करणे, शासन मान्यता न घेता एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविणे इत्यादीमध्ये अनियमितता आढळून आल्याने या बँकेची चौकशी करण्यासाठी ९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या आदेशान्वये सहकार आयुक्तांनी  सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जि. अमरावती यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.





  Print






News - Nagpur




Related Photos