युवक काॅंग्रेसने केला केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारचा निषेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
उत्तर प्रदेश मधील उन्नाव येथील भाजपा आमदार कुलदिप सिंग सेंगर यांच्याकडून बलात्कार पिडीतेच्या परीवारावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करीत युवक काॅंग्रेसने स्थानिक इंदिरा गांधी चौकात  केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. 
स्थानिक इंदिरा गांधी चौकात  युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  घोषणाबाजी केली. भाजपा आमदार कुलदिप सिंग सेंगर यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
यावेळी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, केसरी पाटील उसेंडी, जितेंद्र मुनघाटे, सतिश विधाते, रजनिकांत मोटघरे, विश्वजीत कोवासे, एजाज शेख, नंदु वाईलकर, बाळु मडावी, अधीर इंगोले, कुणाल पेंदोरकर, गौरव अलाम, नितेश राठोड, विलास ठाकरे, वाशिद शेख, प्रतिक बारसिंगे, विवेक रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-31


Related Photos