महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध रेल्वे स्थानकावरील थांबे पूर्ववत करावे


- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे खासदार रामदास तडस यांची मागणी

- तुळजापूर रेल स्थानकावरील थांब्याकरिता झालेल्या आंदोलनाबाबत दिली माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली (वर्धा) : वर्धा लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त महत्वपुर्ण एकूण १३ मोठी रेल्वे स्थानके आहेत, संदी रेल्वे, तुळजापूर, सेवाग्राम, हिंगणघाट, वर्धा, पुलगांव, धामणगांव, चांदूर, वरुड (ऑंरेज सिटी), मोर्शी या रेल्वेस्थानकावरुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या महत्वपुर्ण स्टेशनवर थांबे त्वरीत मंजुर करावे, सोबत वर्धा लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाचे निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याकरिता व सोबतच प्रवासी वर्गाकडून आलेल्या मागण्या शासन दरबारी पोचवण्याकरित्या वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी आज रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटीलयां ची नवी दिल्ली येथे भेट घेऊन तुळजापूर रेल स्थानकावरील थांब्याकरिता आज झालेल्या आंदोलनाबाबत माहिती दिली व थांबे मंजुर झाले नाही तर आंदोलन मोठे होईल याबाबत अवगत केले.

महत्वपुर्ण रेल्वे स्थानकावरील पुर्वी मंजुर असलेले थांबे तात्काळ मंजुर करण्यासाठी हिंगणघाट, तुळजापूर, चांदूर रेल्वे येथे आंदोलन झाली, तसेच थांबे मजुर करण्यासाठी उपोषन केलेले आहे, वर्धा लोकसभा क्षेत्रात सर्वात जास्ते रेल्वे स्टेशन येत असल्यामुळे प्रवाशांच्या अडचणी खासदार रामदास तडस यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर प्रभावीपणे मांडल्या व मंत्री महोदयांनी रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक यांना वर्धा लोकसभ क्षेत्रातील रेल्वे स्थानकावरील थांबे बाबतचा विषय तातडीने लक्ष देवुन सोडवण्यिाचे आदेशीत केले. यावेळी रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (कोचींग) देवेन्द्र कुमार उपस्थित होते.

रेल्वे थांबे पूर्ववत सुरू व्हावे यासाठी लोकसभेमध्ये नियम ३७७ अंतर्गत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला, सतत मंडळ रेल प्रबंधक, महाप्रबधंक, रेल्वेमंत्री यांची भेट घेत आहे, वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रवास करणाऱ्यांच्या नागरिकांच्या विविध रेल्वेस्थानकावरील थांब्याविषयी अडचणी व भावना व्यक्त केल्या आहे, आज तुळजापूर येथील आज झालेले आंदोलन लक्षात घेऊन तातडीने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील तसेच रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली असुन रेल्वेस्थानकवरील थांब्यावर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच प्रवासी वर्गाच्या मागण्या मान्य होतील, अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी यावेळी दिली.





  Print






News - World




Related Photos