महत्वाच्या बातम्या

 श्रीमद् भागवत सप्ताह निमित्य श्री गणेश मंदिर टेकडी येथे महाप्रसाद संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूरातील सुप्रसिध्द श्री गणेश मंदिर टेकडी येथे, संगीतमय श्रीमद् भागवत कथामृत वर्षा ज्ञान पूज्य आचार्य श्री श्रीश कृष्ण दासजी महाराज यांच्या अमृत वाणीने १ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२३ पर्यंत कथा वाचन झाले. श्री गणेश मंदिर टेकडीचे बांधकाम पूर्ण झाल्याबद्ल श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी भव्य भक्तांनी याचा लाभ घेतला. या भागवत सप्ताहाचे समारोप ८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसादाने झाले. यावेळी ३ ते ५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथून आलेला राम अक्षता कलश दर्शन महोत्सव ११ डिसेंबर आणि १२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पासून भक्तांच्या दर्शनाकरीता ठेवण्यात आला आहे. तरी भक्तांनी जास्तीत जास्त संख्येत लाभ घ्यावा.

असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विकास ए. लिमये, उपाध्यक्ष माधव कोहळे, सचिव श्रीराम कुळकर्णी, सहसचिव अरूण व्यास, कोषाध्यक्ष दिलीप शहाकार, विश्वस्त अरूण कुळकर्णी, शांतीकूमार शर्मा, के.सी. गांधी, लखीचंद ढोबळे, संजय एस. जोगळेकर, हरी लक्ष्मण भालेराव यांनी केले.





  Print






News - Nagpur




Related Photos