'त्या' युवतीच्या हत्येप्रकरणी विवाहित प्रियकरास अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील ग्रामीण विकास यंत्रणेत लिपिक पदावर कार्यरत चंद्रप्रभा देवराव अप्पलवार(३२) हिच्या  हत्येप्रकरणी पोटेगाव पोलिसांनी एका   नामदेव दागोजी भोगे(३८) या आरोपीला अटक केली आहे.  तो कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. 
कारवाफा येथील मूळ रहिवासी असलेली चंद्रप्रभा देवराव अप्पलवार ही गडचिरोली येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत लिपिक पदावर कार्यरत होती. गडचिरोली  शहरात खोली करुन ती एकटीच राहत होती. १५ जुलैला दुपारी ४ वाजताच्या सुमारास नातेवाईक आल्याचे सांगून ती कार्यालयातून बाहेर पडली. त्यानंतर दोन दिवस ती कार्यालयात गैरहजर होती. १७ जुलैला पोटेगावनजीकच्या पोहार नाल्याच्या पात्रात तिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनास्थळापासून काही अंतरावर तिची स्कूटीही आढळली होती. त्यानंतर पोटेगाव पोलिसांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात जाऊन सीसीटीव्ही फूटेज तपासले असता आरोपीचा छडा लागला. आरोपी विवाहित असून एक मुलगा असल्याची माहिती आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-25


Related Photos