कोरची - पुराडा मार्गावर ट्रक पलटल्याने दोघे जण जागीच ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची
: छत्तीसगड राज्यातून येत असलेल्या ट्रकच्या चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटून झालेल्या अपघातात चालक आणि अन्य एक जण जागीच ठार झाले आहेत. सदर घटना आज २५ जुलै रोजी सकाळी घडली आहे.
सिजी ०७  बिएम ९२१३ क्रमांकाचा टक छत्तीसगड राज्यातून येत होता. कोरची - पुराडा मार्गावर बेडगाव पासून ४ किमी अंतरावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टक पलटला. हा अपघात इतका भिषण होता की चालकाचा आणि वाहकाचा चागीच मृत्यू झाला. चालक वाहनाखाली अक्षरशः चिरडल्या गेला. वृत्त लिहीपर्यत मृतकांची नावे कळू शकली नाहीत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-25


Related Photos