महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी गोदाम बांधकाम योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल गळीतधान्य व तेलताड २०२३-२४ योजनेंतर्गत गोदाम बांधकाम बाब मंजूर आहे. अन्नधान्य व गळीतधान्य उत्पादनाच्या सुरक्षित साठवणूक व मुल्यवृध्दीसाठी गोदाम सुविधा आवश्यक असून ज्या ठिकाणी भात, गहु, कडधान्य व गळीतधान्य पिके घेतली जातात. तथापि गोदामाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी गोदाम बांधकाम करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघ,कंपनी करिता ही योजना अनुदानावर मंजूर आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे.

योजनेंतर्गत २५० मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्याची त्याच्या ५० टक्के किंवा १२.५० लाख रुपये यापैकी जे कमी असेल अनुदान अनुज्ञेय आहे. गोदाम बांधकाम ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून ईच्छूक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ/कंपनी) केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँक कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार (शेतकरी उत्पादक संघ/कंपनी) सदर लाभास पात्र राहील.

गोदाम बांधकामाबाबत अटी व शर्ती- वखार महामंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे तांत्रिक निकष, मान्यता प्राप्त डिझाईन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाजपत्रकाप्रमाणे बांधकाम आर्थिक अर्थात पूर्ण करणे बंधनकारक राहील. अपूर्ण बांधकामास पुढील अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. अपूर्ण बांधकाम मंजूर डिझाईन स्पेसिफिकेशनमध्ये बदल करुन बांधकाम केल्यास अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या कृषीमाल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात करावा. गोदामाच्या उद्देशाप्रमाणे त्याचा वापर अधान्य सुरक्षित साठवणुकीसाठी करणे बंधनकारक राहील. अन्नधान्याचे साठवणूक सुविधेअभावी नुकसान होऊ नये म्हणून संबंधितांना कृषी विज्ञान केंद्रामार्फतप्रशिक्षण द्यावे. गोदाम भाडे तत्वावर द्यायचे झाल्यास शेतकरी उत्पादक कंपनीने तालुका कृषी अधिकारी यांच्या सल्ल्याने कार्यपध्दती ठरवावी. गोदामात अग्निशमन व्यवस्था असावी. दर्शनी भितीवर बोर्ड असावा.  इच्छूक अर्जदारांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संपर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos