महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२८ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१४२० : बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.

१४९० : क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.

१६३६ : अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.

१८८६ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.

१९०४ : पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९२२ : बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.

१९४० : दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.

१९६९ : तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.

२८ ऑक्टोबर जन्म

१८६७ : स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९११)

१८९३ : शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)

१९३० : हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय तथा अंजान यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७)

१९५५ : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस् यांचा जन्म.

१९५५ : भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी यांचा जन्म.

१९५६ : ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदिनेजाद यांचा जन्म.

१९५८ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म.

१९६७ : अमेरिकन अभिनेत्री ज्यूलिया रॉबर्टस यांचा जन्म.

१९७९ : युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.

२८ ऑक्टोबर मृत्यू

१६२७ : ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १५६९)

१८११ : राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १७७६)

१९०० : जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८२३)

१९४४ : डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)

२००२ : एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)

२०१० : ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)

२०१३ : भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos