महत्वाच्या बातम्या

 भारत २०३० पर्यंत बनणार जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशातील अर्थव्यवस्थेविषयी जागतिक स्तरावर वेळोवेळी चर्चा होत असताना आपण पाहतो. दरम्यान, आता एक अहवाल समोर आला असून त्यात भारताची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत जगात तिसऱ्या क्रमांकाची होणार असल्याचे म्हटले आहे. S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंगने सोमवारी जारी केलेल्या नवीन पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (PMI) यांच्या अहवालात याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

२०२१ नंतर, २०२२ या वर्षात सलग दोन वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे आणि यामध्ये चालू आर्थिक वर्ष २०२३ मध्येही भारत चांगल्या वाढीसह पुढे जात आहे. सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, परंतु २०३० पर्यंत जपानला मागे टाकून ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते, अशी माहिती यातून देण्यात आली आहे.

त्यासोबतच भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि IMF पासून जागतिक बँकेपर्यंत सर्व जागतिक एजन्सींनी देशाप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. भारतावर विश्वास व्यक्त करताना, S&P ग्लोबलने आपल्या अहवालात म्हटले आहे की येत्या सात वर्षांत देश चांगली कामगिरी करेल आणि २०३० पर्यंत ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, एजन्सीने विश्वास व्यक्त केला आहे की सात वर्षांत म्हणजे २०३० पर्यंत भारताचा जीडीपी ७ हजार ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि जपानचा जीडीपी मागे राहील. S&P Global च्या मते, भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ६.२ टक्के ते ६.३ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच, या संदर्भात, मार्च २०२४ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. S&P ग्लोबलच्या अहवालात असे म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची सातत्याने वाढ होणे अपेक्षित आहे आणि या वाढीमध्ये सर्वात मोठे योगदान देशांतर्गत मागणी असेल. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.





  Print






News - World




Related Photos