महत्वाच्या बातम्या

 रस्त्यांच्या कामावर आ. विनोद अग्रवाल यांचे विशेष लक्ष : स्वतः जाऊन केली पाहणी


- इर्री ते अंभोरा पर्यंत १५कोटीच्या निधीतून तयार होत आहे साडेपाच मीटर रुंद रस्ता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. याशिवाय एक गाव दुसऱ्या गावाला जोडण्यासाठी आणि त्या गावांचे रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी रुंद डांबरी रस्ते तयार करण्यात येत आहेत. हजारो कोटी रुपयांचे रोडमॅप तयार असून अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. या कामांची पाहणी करण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वत: इर्री गावाजवळ पोहोचून इर्री ते अंभोरा गावापर्यंत १५ कोटी रुपये खर्चून सुरू असलेल्या डांबरी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यांनी रस्त्यावर उतरून कामाची पाहणी केली व संबंधित कंत्राटदाराशी फोनवर बोलून कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. सदर रस्ता हा जिल्हा रस्ता महामार्ग स्तरावर साडेपाच मीटर रुंद करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले कि, आमदारकीची सूत्रे हाती घेताच असे लक्षात आले कि क्षेत्रातील बहुतांश रस्ते अरुंद आणि जीर्ण अवस्थेत होते. बदलत्या जगात प्रत्येक गाव प्रगतीच्या मार्गावर आहे. वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र रस्ते सुस्थितीत नसतील तर नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र आता आम्ही प्रत्येक रस्त्याचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्यापैकी अनेक कोट्यवधी रुपयांचे रस्ते मंजूर झाले असून, कामाला सुरुवात झाली आहे. गावातील रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडले जात आहेत. येत्या काळात प्रत्येक भागात रस्त्यांचे जाळे विणणार आहे जेणेकरून संपूर्ण परिसर एकमेकांशी जोडला जाईल. दळणवळण सोपे झाल्याने प्रत्येक गावाचा विकास होईल.





  Print






News - Gondia




Related Photos