कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील शिफा उर्फ शबाना शेख ला सहा दिवसांची पोलिस कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 तालुका प्रतिनिधी/ देसाईगंज :
शहरातील बहुचर्चित कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी शिफा उर्फ शबाना मोहम्मद शेख व तिचा भाचा निसार चौधरी याला २४ जुन रोजी उत्तरप्रदेशातील बलरामपुर जिल्ह्यातील गोकुल बुजुर्ग येथून अटक केल्यानंतर दोघांनाही आज २६ जुन रोजी देसाईगंज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 
  दरम्यान शिफा उर्फ  शबाना राज मोहम्मद शेख व तिचा भाचा निसार चौधरी देसाईगंज पोलिसांच्या हाती लागले असले तरी तिचा पती राज मोहम्मद शेख उर्फ उर्फ  चौधरी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. देसाईगंज पोलिस त्याचाही कसुन शोध घेत असल्याची माहिती  प्राप्त झाली आहे. दरम्यान शिफाच्या अटकेने देसाईगंज शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-26


Related Photos