कळमेश्वर पोलिस ठाण्यातील हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
अदखलपात्र गुन्हा दाखल असलेल्या तक्रारदार व त्याच्या मुलावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी १०  हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कळमेश्वर पोलिस ठाण्यातील हवालदारावर कारवाई केली आहे.
रामचंद्र केशवराव ईखार  (५४) असे लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार वरोडा पोष्ट ब्राम्हणी ता. कळमेश्वर जि. नागपूर येथील रहीवासी असुन शेती करतो. तक्रारदार व  मुलाविरूध्द कळमेश्वर पोलिस ठाण्यात   अदखलपात्र गुन्हा नोंद असुन सदर गुन्ह्याच्या चौकशीकरिता तक्रारदाराला व त्यांच्या मुलाला पोलिस ठाण्यात  हजर राहण्याकरिता  हवालदार रामचंद्र ईखार यांनी तक्रारदाराच्या पत्नीकडे निरोप दिला. तक्रारदार व त्याचा मुलगा पोलिस ठाण्यात जाउन हवालदार रामचंद्र ईखार यांना भेटले असता तक्रारदारास त्यांचेवर व मुलावर कोणतीही कार्यवाही न करण्याकरीता  २५  हजार  रूपये लाच रकमेची मागणी केली.  याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर तर्फे आज २६  जून रोजी सापळा  रचून तडजोडअंती हजारांची लाच स्वीकारताना पोलिस ठाण्यासमोरील टी स्टाॅलमध्ये रंगेहात पकडण्यात आले.  यावरून आरोपीविरूध्द कळमेश्वर पोलिस ठाण्यात  लाचलुचपत प्रतिबंध कायदा १९८८  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही  पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक (अतिरिक्त कार्यभार)  श्रीकांत धिवरे,  अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार,  यांच्या मार्गदर्षनात पोलीस निरीक्षक  प्रफुल गीते, नापोशि रविकांन्त डहाट, मंगेश कळंबे, मपोशि करूणा मेश्राम, चालक पोहवा गुलाब मेश्राम यांनी केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-06-26


Related Photos