महत्वाच्या बातम्या

 तुती लागवड नाव नोंदणी अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शेतकऱ्यांना रेशीम शेती आणि इतर पिकांच्या तुलनेत मिळणारा भरघोस फायदा व नफा याचे महत्व पटवून देण्यासाठी तुती लागवड नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शेतक-यांनी लाभ घेऊन  तुती लागवडीसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतक-यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तिन वर्षासाठी प्रति एकर ३ लाख ९७ हजार ३३५ रुपये तुती लागवड, किटक संगोपनगृह बांधकाम, मजुरी व साहित्याकरिता देण्यात येते. कृषि विभागाच्या पोकरा योजनेंतर्गत तुती लागवडीकरीता सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी ७५ टक्के अनुदानावर रुपये ४५ हजार व किटक संगोपनगृह बांधकामाकरीता सर्वसाधारण लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १ लाख २६ हजार ४८९ रुपये व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीकरीता ९० टक्के अनुदानावर रक्कम १ लाख ५४ हजार ७७५ रुपये  तसेच किटक संगोपन साहित्य सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता ७५ टक्के अनुदानावर ५६ हजार २५० रुपये व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करीता ९० टक्के अनुदान  रक्कम ६७ हजार ५०० रुपये दिले जाते. 

ज्या लाभार्थींना मनरेगा व पोकरा या दोन्ही योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्व लाभार्थ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ योजनेअंतर्गत दोन एकर रेशीम शेतीसाठी अंदाजपत्रकीय रक्कम ७ लाख ५० हजार रुपये  मधुन सर्वसाधारण लाभार्थ्यांकरीता ७५ टक्के अनुदान व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करीता ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.  या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेतक-यांना लाभ देण्यात येईल. तसेच एक एकर रेशीम शेतीसाठी अंदाजपत्रकीय रक्कम ५० हजार रुपये मधून सर्वसाधारण लाभार्थ्यांकरीता ७५ टक्के अनुदान व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करीता ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

ज्या शेतक-याकडे किमान एक एकर जमीन आहे, बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध आहे तसेच जमीन पाण्याचा निचरा होणारी आहे, असे शेतकरी हमखास रेशीम शेती करुन वर्षाकाठी एकरी किमान दोन लाखाचे उत्पन्न मिळवू शकतो.

मनरेगा, पोकरा व केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ योजना अंतर्गत तुती रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढविणे, तुती रोपांची लागवड करुन पर्यावरणाचा संतुलन राखणे व उत्पादनात वाढ करणे तसेच रेशीम तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. तुती लागवड नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून एकरी नोंदणी फी ५०० रुपये जिल्हा रेशीम कार्यालय येथे भरणा करुन आपली नोंदणी करावी.  

अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, महात्मा फुले कॉलनी, चेतना डीएड कॉलेजजवळ, मास्टर कॉलनीच्या समोर, सावंगी मेघे येथे संपर्क साधावा किंवा रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे यांच्या ९८३४७५३८०३, वरिष्ठ तांत्रिक सहायक रजनी बन्सोड ९८६०७६१८४६, क्षेत्र सहायक डी.पी.भैरम, ९३७००५१५३५ शुभम ताकोते यांच्या ७८७५६६८४५७ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे रेशिम विकास अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos