छत्तीसगडमध्ये नक्षल्यांकडून सपा नेत्याची धारदार शस्त्राने हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बिजापूर :
समाजवादी पक्षाचे नेते संतोष पुनेमा यांची धारदार शस्त्राने वार करून नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. ही घटना बिजापूर पोलीस स्टेशनहून अवघ्या १५ किमी अंतरावर घडली असून पुनेमा यांचा मृतदेह जप्त करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झालं आहे. 
मरिमल्ला गावचे रहिवाशी असलेले संतोष पुनेमा बिजापूर जिल्हा समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष होते. व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या पुनेमांनी २०१८ मध्ये विधानसभा निवडणूकही लढवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी पुनेमा यांची मरिमल्ला येथील एका कन्सट्रक्शन साइटवरून अपहरण केलं. आज सकाळी येथील घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली आहे. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 
छत्तीसगडमध्ये याआधीही नक्षलवाद्यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या हत्या केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचीही अशाचप्रकारे हत्या करण्यात आली होती. 

 



  Print






News - World | Posted : 2019-06-19






Related Photos