महत्वाच्या बातम्या

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा अंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहीन कुटूंबाना ४ एकर कोरडवाहु किवा २ एकर बागायती शेतजमीन १००% अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येते.

यासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती / नवबौध्द घटकातील असावा. अर्जदार हा भंडारा जिल्हातील रहीवासी असावा. अर्जदार हा दरिद्रय रेषेखालील असावा (दरिद्रय रेषेखालील यादीमध्ये नावाची नोंद आवश्यक) अर्जदार भूमिहीन शेतमजुर असावा. अर्जदाराची वयोमर्यादा १८ ते ६० वर्षापर्यंत असावा.

दरिद्रय रेषेखालील विधवा व परित्यक्ता स्त्रिया यांना प्राधान्य देण्यात येते. अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचार ग्रस्त यांना प्राधान्य देण्यात येते. भंडारा जिल्हातील रहीवासी असणा-या व्यक्तींनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, जिल्हा परिषद चौक भंडारा येथून अर्ज प्राप्त करून घेवुन अर्ज सादर करावे. असे  आवाहन बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.अधिक माहीतीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा येथे संपर्क साधावा.





  Print






News - Bhandara




Related Photos