महत्वाच्या बातम्या

 लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूल वरोरा येथील मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर


- नागपूर विभाग शालेय स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात अजिंक्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : वर्धा येथे झालेल्या नागपूर विभागीय स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात लोक शिक्षण संस्था, वरोडा अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य इंग्लिश मिडीयम स्कुल ने चंद्रपूर जिल्हाचे प्रतिनिधित्व करताना नागपूर जिल्ह्याचा २५-१८, २५-२१ असा सरळ दोन डावात पराभव करीत बोईसर जिल्हा पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेकरिता पात्र ठरला आहे.

विजयी संघात ईश्वरी राऊत, वैष्णवी गुंतीवार, संचिता हजारे, राशी मांडवकर, श्रावणी ताजने, ईशा बदकी, क्रिष्णा कथडे, समृद्धी पिंगे, नव्या राजूरकर, अनुराधा बोथले, तन्वी उमक, वैष्णवी मिलमीले यांचा समावेश होता.

मागील वर्षी सुद्धा लोकशिक्षण संस्थेच्या मुलींच्या तिन्ही गटात राज्यस्तरावर प्रवेश प्राप्त करीत प्रविण्य मिळवले होते हे विशेष.

लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळपाटील, कार्यवाह विश्वनाथ जोशी, एडवोकेट दुष्यंतजी देशपांडे, मुख्याध्यापक संजय आंबुलकर, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जिवतोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, भोजराज चौधरी, संदीप उईके यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.

सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय जेष्ठ मार्गदर्शक सुनील बांगडे, अनिल घुबडे, गणेश मुसळे, प्रशिक्षक निखिल बोबडे, संघ व्यवस्थापक वनश्री पालमकुलवार, दुशांत लांडगे व पालक तसेच लोकशिक्षण संस्था वरोडा यांना दिले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos