वायुसेनेच्या बेपत्ता 'एएन-३२' विमानाचे अवशेष सापडले


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या एएन-३२ विमानाचे काही अवशेष मंगळवारी   शोध मोहिमेदरम्यान अरूणाचल प्रदेशातील लिपोच्या उत्तरीय भागात आढळून आले आहेत. तर विमानाच्या अन्य भागाचा शोध घेणे सुरू आहे. 
'एएन-३२'  हे विमान ३ जून रोजी जोराहाट येथून निघाले होते व त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. यामध्ये आठ क्रू मेंबरसह १३ प्रवासी होते.  वायुसेनेचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी शोध मोहिम अजुनही सुरू आहे मात्र बेपत्ता विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही, अशी माहिती दिली. 
खराब हवामान असूनही भारतीय वायुसेनेकडून या विमानाची शोधमोहिम युद्धपातळीवर राबली जात आहे. हे विमान अरूणाचल प्रदेशकडे जाण्याच्या मार्गावरच बेपत्ता झाले. मागिल आठवड्यात बुधवारी वायुसेनेने या विमानाच्या शोधासाठी एसयू – ३० जेट लढाऊ विमान, सी १३० जे, एमआय १७, व एएलएच हॅलिकॅाप्टर पाठवलेले आहे. ही शोधमोहिम आसामच्या जोरहाट ते अरूणाचल प्रदेशच्या मेचुका ॲडव्हान्स्ड लॅण्डिंग ग्राउंडदरम्यान असलेल्या वन क्षेत्रात केली जात आहे. याशिवाय भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे उपग्रह काटरेसॅट व आरआयसॅट यांच्याद्वारे देखील या भागांची छायाचित्र काढण्यात आली आहेत.   Print


News - World | Posted : 2019-06-11


Related Photos