महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली शहरामध्ये सेवा पंधरवाडा उपक्रमास शुभारंभ


- भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी करून आरोग्य शिबिरास केले सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : देशाच्या लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशामध्ये सेवा पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवा पंधरवाडा या उपक्रमामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर विविध कार्यक्रम घेऊन संपूर्ण देशभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये सेवा पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात सुरुवात झालेली आहे.

भाजपा गडचिरोली शहराच्या वतीने व युवा मोर्चाच्या वतीने आज पासून गडचिरोली शहरांमध्ये सेवा पंधरवडा या उपक्रमात सुरुवात झालेली आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या पुढाकाराने स्थानिक राजीव गांधी नगर परिषद शाळा आठवडी बाजार गडचिरोली येथे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी करून आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड, नमो प्रदर्शन ची सुरुवात केले. आयुष्यमान भारत व आभा कार्डची नोंदणी करून त्यात कार्ड वाटप करण्यात आले त्यामध्ये २०० नागरिकांची नोंदणी करून कार्ड वाटप करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नववर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामांची प्रदर्शनी करण्यात आली या प्रदर्शनीमध्ये केंद्र सरकारने सर्व मान्य जनतेसाठी योजना,कामे केले त्याचे पोस्टर लावून जनतेला दाखवण्यात आले.

त्याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महिला प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, शहर महामंत्री केशवजी निंबोड, विलास नैताम, तुळशीराम भांडेकर, महिला मोर्चा महामंत्री वर्षा शेडमाके, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, महिला ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष अर्चना निंबोड, वर्षा कानपलिवार, सुनिता गुरूनुले, भाग्यश्री गुरुनुले व स्थानिक नागरिक व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos