महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर येथे १ कोटी ११ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : नागपुर व अमरावती येथील दक्षता विभागाने विसापूर टोल नाक्यावर धडाकेबाज कारवाई करून कोट्यवधींचा अवैध सुगंधी तंबाखू जप्त केला आहे.

नागपुर व अमरावती येथील दक्षता विभागाला कर्नाटक राज्यातून बल्लारपूर मार्गे बंदी असलेला सुगंधी तंबाखू अवैधरीत्या विक्रीसाठी तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करून दक्षता विभागाने सायंकाळपासून विसापूर टोल नाक्यावर सापळा रचला. रात्रीच्या वेळी कर्नाटक राज्यातून येणारे MH-25-U-1211 व TS-07- UE-7208 हे दोन 12 चाकी ट्रक टोल नाक्यावर येताच दक्षता विभागाच्या चमूने त्यांना अडवून विचारपूस सुरू केली असता सुरुवातीला दोन्ही ट्रक चालकांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र खात्रीशीर माहिती आणि ट्रक मधुन येणारा सुगंधी तंबाखूचा वास वरून दक्षता विभागाची दोन्ही ट्रक मधुन अवैध सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची खात्री पटल्याने त्यांनी दोन्ही ट्रकच्या ताडपत्री उघडण्यास सांगितले. ट्रकची झडती घेतली असता त्यात अवैध सुगंधी तंबाखू आढळून आल्याने दोन्ही ट्रक ताब्यात घेऊन बल्लारपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे ट्रक मध्ये असलेल्या सर्व पोत्यांची तपासणी केली असता अंदाजे १ कोटी ११ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा सागर नावाचा अवैध तंबाखू आढळून आला असून हा आकडा वाढण्याची शक्यता नागपुर अन्न व औषधी प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा सुगंधित तंबाखू बिदर कर्नाटक येथून मध्य प्रदेश येथे घेऊन जाणार होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos