अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवर पावसाळ्यापूर्वीच उपाय योजना करा


- पालकमंत्री  ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांचे निर्देश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवर पावसाळ्यापूर्वीच उपाय योजना करून नागरिकांना सर्वोत्तपरी मदत करा असे निर्देश पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी दिले आहेत. 
 काल ३ जून रोजी गडचिरोली  पालकमंत्री ना.  राजे अम्ब्रीशराव यांनी जिल्हा दौऱ्यात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला.    गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम असून मान्सूनमधील अतिवृष्टीमुळे नागरिकांना अनेक संकटाना सामोरे जावं लागतं. त्यामुळे  पालकमंत्री ना. आत्राम यांनी महावितरणाचे  मुख्य अभियंता हरीश गजबे यांच्याशी जिल्ह्यामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांवर चर्चा केली तसेच महावितरणाच्या उपाय योजनेचा आढावा घेतला. अनेकदा पावसामुळे झाडांची पडझड होऊन विज खंडित होऊन संपर्क तुटला जातो.  त्यामुळे महावितरणाच्या जिल्हा तसेच तालुका कार्यालयातील हेल्पलाईन नंबर दक्षतेने हाताळून नागरिकांच्या समस्येवर त्वरीत कारवाई करून मदत करण्याचे निर्देश दिले. तसेच  संबंधित निवासी अधिकारी आणि कर्मचारी यांनी दक्षता घेऊन नागरिकांना सर्वोत्तपरी मदत करण्याचे निर्देश आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम  यांनी दिले.
 आढावा बैठकीमध्ये  सदावर्ते ( कार्यकारी अभियंता,महावितरण,आलापल्ली)  मेश्राम ( अतिरिक्त कार्यकारी अभियंता,आलापल्ली विभाग) यांची उपस्थिती होती.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-04


Related Photos