महत्वाच्या बातम्या

 तान्हा पोळा बालगोपालांसाठी शेती संस्कृतीचे दर्शन घडविणारे पर्व : आ. किशोर जोरगेवार


- इंदिरा नगर, बाबूपेठ येथे तान्हा पोळा निमित्त नंदी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरोना काळा नंतर आता आपण आपले उत्सव उत्साहात साजरे करु लागलो आहे. हे उत्सव साजरे झाले पाहिजे. या उत्सवांमध्ये आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. पोळा हा सण शेतकरी बांधवांना समर्पीत आहे. तर दुस-या दिवशी साजरा होणारा तान्हा पोळा हा बालगोपालांसाठी  शेती संस्कृतीचे दर्शन घडविणारे पर्व असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

तान्हा पोळा निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने इंदिरा नगर येथे तर नेताजी मित्र परिवारच्या वतीने बाबूपेठ येथे नंदी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. इंदिरा नगर येथील कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे नितेश गवळी, सिद्धार्थ मेश्राम, एकनाथ मोहितकर, महेश चहारे, प्रविण पंचबुध्दे, संदीप जाधव, मुकेश करवटकर, बंडू कुळमेथे, जय मिश्रा, राधाकृष्ण सेवा समितीचे अध्यक्ष मोरेश्वर केरेकर, गजानन शेंडे, संदिप पाटणकर, मुकेश जिवतोडे, भद्रा आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. तर बाबूपेठ येथील कार्यक्रमात शक्तीवीर धिराल, पूष्पा पोडे, सामाजिक कार्यकर्ता सुरेश बंडिवार, माजी नगरसेवक हनुमान चैके, अरुन जोगी, निट सर, डॉ. निरंजने, यंग चांदा ब्रिगेडचे प्रशांत रोहणकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपले पारंपरिक उत्सव हे आपली संस्कृती दर्शवनारे आहे. याचे जतन केल्या गेले पाहिजे. आपण मागच्या वर्षी पासून चंद्रपूरात श्री. माता महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. यंदाही १९ ऑक्टोंबर पासून या पाच दिवसीय महोत्सवाला सुरवात होणार आहे. आपली आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीची महती राज्यभरात पोहोचावी हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. आपण या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले.

आज इंदिरा नगर येथे हा भव्य कार्यक्रम आयोजित केल्या जात आहे. या भागावर आपले विषेश लक्ष राहिले आहे. या भागात सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी खुले मंच उभारण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी निधी देता आला याचा आनंद आहे. २० लक्ष रुपयातून तयार झालेल्या या खुल्या मंचाचे आज लोकर्पण झाले असे मी आज जाहिर करतो, पूढेही या भागाच्या विकासाठी निधी कमी पडू देणार नाही. येथे सुदंर अशी अभ्यासिका तयार व्हावी यासाठी माझे प्रयत्न आहेत. आपण जागा उपलब्ध करुन दिल्यास यासाठी मोठा निधी आपण देऊ असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. बाबूपेठ भागाच्या विकासासाठीही आपण कटिबद्ध आहोत. येथील महादेव मंदिर येथे अभ्यासिकेसाठी आपण साडे तिन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तर सावित्री बाई शाळेला स्मार्ट स्कुल बनविण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करुन दिला असल्याचे ते यावेळी म्हणाले.

तान्हापोळा बहुतेक लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. आपण या दिवशी आपल्या लहान मुलांना लाकडी बैल सजवून देतात. त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. मात्र या उत्सहामुळे लहान मुलांमध्येही बैल या पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीयन संस्कृती जपल्या जाते. हाच तान्हा पोळा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी उत्कृष्ट नंदी बैल सजविलेल्या बालगोपाळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 





  Print






News - Chandrapur




Related Photos