महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्ह्यात आजपासून मिशन इंद्रधनुष्यच्या दुसरी फेरीला सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहिमेची दुसरी फेरी आजपासून सुरु झाली आहे. यात ११ ते १६ सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी घरातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे प्राधान्याने लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी केले आहे.

जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०  कार्यक्रम हाती घेतला आहे. आता दुसरा टप्पा ११ ते १६ सप्टेंबर, तर तिसरा टप्पा ९ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. दोन ते पाच वर्ष वयोगटातील ज्या बालकांचा गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचे लसीकरण करणे, गर्भवती महिलांना लसीकरण करणे, ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकाचा यामध्ये समावेश असल्याची माहिती जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.रेवती साबळे यांनी दिली.





  Print






News - Nagpur




Related Photos