हज़रत सैय्यद अहमद जीलानी सरकार यांच्या निधनाने गडचिरोलीवर शोककळा : माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतले अंतिम दर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोलीतील अत्यंत प्रसिद्ध आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व हज़रत सैय्यद अहमद जीलानी सरकार यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी बाबा जीलानी दर्गा, गडचिरोली येथे पोहोचून त्यांच्या पार्थिवाचे भावपूर्ण दर्शन घेतले व श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी खा.डॉ. अशोकजी नेते यांनी दर्शन घेत भावना व्यक्त करत म्हणाले की, जीलानी बाबा हे गडचिरोलीतील अत्यंत नावाजलेले आणि श्रद्धेचे स्थान होते. त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी दूरदूरवरून भाविक मोठ्या संख्येने येत असत. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याची आणि भाविकांची मोठी हानी झाली असून ही अतिशय दुःखद घटना आहे.
बाबा जीलानी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्यासोबत जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,सलिम शेख,संजय बारापात्रे,तसेच भाजपचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी बाबांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.




Petrol Price




