गडचिरोलीत औषध विक्रेत्यांचा संप, शहरातील मेडिकल दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ बंद


- संपाला व्यापारी संघटनेचा पाठिंबा  
- शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून औषध विक्रेत्यांनी व्यक्त केला संताप
- जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
औषधाच्या आॅनलाइन विक्री ई - फार्मसीजच्या निषेधार्थ गडचिरोलीतील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे़.  या संपामुळे शहर व जिल्ह्यातील संपूर्ण मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच संपाला व्यापारी संघटनेने पाठिंबा दर्शवत बाजारपेठ बंद ठेऊन संपात सहभागी झाले होते . 
औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी इंदिरा गांधी चौकातून  जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया आर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला़.  यावेळी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रेत्यांच्या विरोधातील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले़. 
या मोर्च्यात संघटनेचे नागपूर विभाग अध्यक्ष सुरेश सारडा , जिल्हा सचिव दीपक वैद्य, कोषाध्यक्ष दिनेश कोंडे , माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रभान जेणेकर, सतीश विधाते ,  देवेंद्र सोमणकर , राजेश तुम्मे, अविनाश धाइत , निलेश चन्नावार , विपुल चन्नावार , अविनाश कोमत,विजय देवकुले , तुषार चन्नावार , विशाल कुकडे , मदाद जीवनी ,दिलीप बंडावर , नितीन डोंतुलवार , गोविंद निरंकारी ,राजेश इटनकार , दिनेश पुंडे , विजय चौधरी , किशोर म्हस्के , ओमप्रकाश नाकाडे यांच्यासह  शेकडो औषधी विक्रेते व व्यापारी सहभागी झाले होते़.    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-28


Related Photos