महत्वाच्या बातम्या

 माजी सैनिक, पत्नी व पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ९० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विभागीय शिक्षण मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिकांच्या पाल्यांना १० हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुंटूबियांनी १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच विविध खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी मिळविणारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाची लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्य यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos