लसीकरणानंतर बाळाचा मृत्यू : हर्षवर्धन बाबा आत्राम यांची काप्पेवंचात धाव


- घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम काप्पेवंचा गावात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली आत्राम यांनी काप्पेवंचा येथे धाव घेत मृत बाळाच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी आत्राम दाम्पत्याने तलांडी कुटुंबीयांकडून घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. बाळाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर यावे तसेच दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी यावेळी व्यक्त केली. दुःखद प्रसंगी त्यांनी तलांडी कुटुंबीयांना धीर दिला.
घटनेची माहिती घेत असताना आरोग्य विभागाचे अधिकारी, अहेरी तालुका आरोग्य अधिकारी तसेच राजाराम पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. लसीकरणानंतर बाळाची प्रकृती खालावल्याची माहिती कुटुंबीयांनी यावेळी उपस्थितांसमोर दिली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, राजारामचे माजी सरपंच विनायक आलाम, काप्पेवंचा गावचे पाटील कोत्ता आत्राम, सलीम शेख, इरपा तलांडी, डॉ. गाईन, सुनील नैताम, कांदो आत्राम, डोबी आत्राम, संतोष आत्राम, राजू तलांडी, लक्ष्मण आत्राम, विनोद तलांडी, दिनेश तलांडी यांच्यासह काप्पेवंचा येथील ग्रामस्थ व तलांडी कुटुंबीयांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




