महत्वाच्या बातम्या

 कृषी विभागाने दिले पौष्टिक तृणधान्याचे धडे : मनोहर खिरटकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / खाबांडा : वरोरा तालुक्यातील कृषि विभाग वरोरा यांचे मार्गदर्शनात मौजा खांबाडा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना ४ ऑगस्ट २०२३ ला पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अनुषंगाने विद्यार्थ्यामध्ये पौष्टिक तृणधान्य (मिलेट) विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोडो, नाचणी, राळा, भगर इ पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याविषयी कृषि पर्यवेक्षक किशोर डोंगरकार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

तसेच या पौष्टिक तृणधान्याची लागवड व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारातील महत्त्व काय याविषयी कृषि सहायक दिपक चौरे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधुन मार्गदर्शन केले. यासोबतच विद्यार्थ्यांना विविध पौष्टिक तृणधान्याचे बियाणे वितरित करून पालकांच्या मदतीने शेतात लागवड करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

सध्याच्या जीवनशैलीत रोगमुक्त जीवन प्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्तम आहाराचे महत्त्व रुजविण्यासाठी कृषि विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. तालुका कृषि अधिकारी वरोरा सुशांत लव्हटे व मंडळ कृषि अधिकारी  प्रगती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी.पारोधे सर यांचेसह धोटे सर, उकिनकर, नंदकिशोर खिरटकर, पाचभाई, व लिपिक  बबन लोडे, तथा इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos