भारतीय सैन्यदलात पहिल्यांदाच महिलां सैनिकांची ऑनलाईन भरती


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतीय  सैन्यात  पहिल्यांदाच महिलांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. महिलांच्या सैन्य भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात हिंदुस्थानच्या सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
महिलांच्या सैन्य भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारांना २५ एप्रिल  पासून www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर अर्ज दाखल करता येईल. सैनिक पोलीस दलामध्ये महिलांना २० टक्के प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी जाहीर केले होते. सध्या या विभागात जनरल ड्युटीसाठी १०० पदांसाठी रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांची उंची १४२ सेंटीमीटर आणि वय १७ ते २१ वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांमधून छाननी केलेल्या उमेदवारांना शारीरिक आणि लेखी चाचणीसाठी बोलावण्यात येईल.  Print


News - World | Posted : 2019-04-25


Related Photos