महत्वाच्या बातम्या

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व  उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२  व २०२२-२३ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जदार, संस्था ज्यांनी सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्यांना नव्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्या वर्षाचा चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. उपरोक्त कालावधीकरीता पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे. त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहित केलेल्या अटीची पुर्तता करणे आवश्यक राहील. समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी पुरस्कारासाठी १५ आगस्टपर्यंत अर्ज नमूद कागदपत्रासह सादर करावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमार्फत करण्यात आले आहे.

पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos