महत्वाच्या बातम्या

 रत्नापूर-शिवटेकडी रस्त्यावरील नाल्यावर भगदाड पडल्याने शेतकरी अडचणीत


- पाण्याच्या प्रवाहातून करावा लागतो प्रवास : वाहतुक बंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर स्मशानभुमी मार्ग शेवटेकडी येथे जाणारा नवरगांव व नाचनभट्टी मार्गाला जोडणारा रस्ता आहे. सदर पांदण रस्त्याचे काम काही वर्षोंपूर्वी करण्यात आले. या रस्त्यावर विश्वनाथ निकुरे यांचे शेताजवळ बाळतीनझोरा नाला वाहत असल्याने येथुन प्रवास करण्याऱ्या जनतेसाठी प्रवास करण्यासाठी अडचन होवू नये म्हणून नाल्यावा मोठे पाईप टाकुन त्यावर माती टाकण्यात आली होती. या वर्षाला पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने त्या पाईप वरील पूर्ण माती पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेली त्यामुळे त्या नाल्यावर मोठे भगदाड पडले आहे .

भगदड असे पडले की, आपल्या वाहनातून तर सोडा साधे पायदळ सुद्धा जाता येत नाही. त्या रस्त्याला रत्नापूरवासीय जनतेचे शेत मोठ्या प्रमाणात आहेत आणी या हंगामात शेतकरी यांना नेहमी आपले मशागतीचे अवजारासह तसेच रोवणारे महीला यांना नेहमी प्रवास करावा लागतो. या अशा निर्मान झालेल्या परीस्थीतीमुळे शेतकरी यांना मोठ्या अडचनिचा सामना करावा लागत असुन या सरळ रस्त्याने जाता येत नसल्याने ३ ते ४ किमीचा फेरा मारून जावे लागते. नाहीतर पायदळ जाणारे यांना पाण्याच्या प्रवाहातुन जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो आहे. 

सदर रस्त्याने सर्व जनसामान्य जनतेचे श्रद्धा स्थान असलेल्या शिव मंदीर टेकडीवरही भावीक भक्त गण जातात. तसेच नवरगाव नाचनभट्टी या रस्त्याला जोडणारा आहे. त्यामुळे नेहमी सतत वर्दळ असते. त्यामुळे संबधीत विभागानी हया रस्त्याकडे त्वरीत लक्ष देवून दुरुस्त करून प्रवासा योग्य करावा. जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही व प्रवाशांना प्रवास करण्यास सुलभ होईल, अशी मागणी रत्नापूर वासीय जनता करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos