झाडावर चढलेल्या अस्वल ला उतरविण्यासाठी वनविभागाची कसरत


- नागरिकांची गर्दी मात्र ,अस्वल काही उतरेना
विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / गोमणी :
मूलचेरा तालुक्यातील खुदीरामपल्ली गावात आज पहाटेच्या सुमारास नागरिकांना अस्वल चे दर्शन झाले. अस्वल ला गावात पाहून लोकांनी एकच गर्दी केली त्यामुळे लोकांची गर्दी बघून अस्वल गाव शेजारी असलेल्या नाल्याजवळच्या झाडावर बसली . तीला उतरवण्यासाठी 
 वनविभागाचे कर्मचारी सकाळपासून मेहनत घेत होते मात्र अस्वल काही झाडावरून उतरण्याचा नाव घेत नसल्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कसरत घ्यावी लागली.  खुदीरामपल्ली आणि आंबटपल्ली या दोन गावांच्या मध्ये एक मोठा नाला आहे या नाल्याचा बाजूला असलेल्या मोठ्या झाडावर अस्वल ठाम ठोकून बसली होती , लोकांचा जमाव असल्याने तिच्या  मनात भीती निर्माण झाल्याचे दिसून येत होते  मात्र वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन अस्वलाला उतरविण्याचा प्रयत्न करत असतांना या  ठिकाणी दोन्ही गावातील लोकांनी अस्वला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती .
सकाळपासून वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊसाहेब जव्हरे आणि त्यांची चमू लोकांना अस्वल पासून धोका निर्माण होऊ नये म्हणून जमावाला दूर करण्याचा प्रयत्न करीत होती . अस्वल गावात येण्याचा हा पहिलाच प्रकार असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी आता काय करणार आणि अस्वल झाडावरून उतरणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते . एकंदरीत अस्वल ने लोकांच्या आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नाकात दम टाकलेला  होता .दिवसभर ठाण मांडून बसलेली अस्वल शेवटी झाडावरून खाली उतरताच  वनविभागाच्या चमूने  तिला घनदाट जंगलात हाकलून लावले आहे तरी ती  अस्वल पुंन्हा गावात येऊन दहशत तर निर्माण होणार नाही अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा वर्तवली जात आहे. आज पूर्ण दिवस वनविभागाची चमूंनी चांगली कसरत करत तीला  जंगलात पळवून लावले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-19


Related Photos