महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेबाबत जाहीर आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्याअंतर्गत नॉन पेसा क्षेत्रातील शंकरपुर, वडसा (जुनी), कोंढाळा या साज्यावर कोतवाल संवर्गाची प्रत्येकी ०१ असे एकूण ०३ पदाची पदभरती करावयाची आहे. भरती प्रक्रियेबाबत विस्तृत जाहिरनामा संबंधित गावाचे चावडी/मंडळ अधिकारी/तलाठी/ग्रामपंचायत/पंचायत समिती/ नगरपरिषद देसाईगंज तसेच तहसिल कार्यालय देसाईगंज येथील नोटीस बोर्डावर ३१ जुलै २०२३ रोजी प्रसिद्धकरण्यांत येणार आहे. 

तरी इच्छुक उमेदवारांनी जाहिरनाम्यामध्ये दिलेल्या पात्रतेच्या निकष व विहित अटी व शर्तीवर अर्ज सादर करावे. असे सदस्य सचिव कोतवाल निवड समिती तथा तहसिलदार, देसाईगंज एम.यु. गेडाम यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos