महत्वाच्या बातम्या

 अल्पसंख्यांकबहुल शाळांनी सोईसुविधांसाठी १० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावे : जिल्हाधिकारी विपीन इटनकर 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : अल्पसंख्यांकबहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी तसेच अद्ययावतीकरण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मागितले आहे. जिल्ह्यातील प्रस्ताव १० ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पसंख्यांक विभागात सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

शासनाने १८ जुलै २०२३ रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार सन २०२३ -२४ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी तसेच डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातून हे प्रस्ताव ३१ ऑगस्ट पर्यंत मंत्रालयात जाणार आहेत. त्यापूर्वी १० ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा संस्थांना अवगत करून तातडीने प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पसंख्यांक विभागात सादर करावे, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos