माणेमोहाळी परिसरात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ कायम


- वारंवार वनविभागाला सूचना देऊनसुद्धा वाघाला जेरबंद करण्यास नकार
-  क्षेत्रातील लोकप्रतिनिधींचे सुद्द्धा  दुर्लक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चिमूर :
तालुक्या मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मासळ(बूज) - माणेमोहाळी परिसरात वाघाने परिसरात महिनाभरापासून बस्तान  मांडले आहे तरी , दिवसेंदिवस वाघाचा परिसरात धुमाकूळ वाढतच आहे. काल सायंकाळी ४ च्या सुमारास या परिसरात पाऊस आला व विजांचा कडकडाट झाला, त्यादरम्यान शेतात असलेले शेतकरी हे पावसापासून बचाव करण्याकरिता एक झाडाच्या आडोशाला गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने प्रथम बैलावर हमला करण्याचा प्रयत्न केला व नंतर प्रकाश मेश्राम या शेतकऱ्यांकडे धाव घेऊन  हमला करण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक शेतकरी एकावेळी आरडा ओरड केल्याने वाघाने परतीची वाट काढली व त्यामुळे थोडक्यात शेतकरी बचावला .त्यामुळे या ठिकाणी अजूनही वाघाने बस्तान मांडलेले दिसून आले आहे. या परिसरात शेतकरी हे शेतात जात असतात त्यामुळे हा वाघ पुन्हा कधीही नागरिकांवर हमला करू शकतो व अनुचित घटना घडू शकते. गेल्या आठवड्यात मासळ(बूज) तसेच माणेमोहाळी परिसरात वाघाने दोन बैलांचा फडशा पडला होता. तसेच त्याअगोदर मासळ(बूज)-तुकुम परिसरात नागरिकांना वाघाचे दर्शन झाले होते, याची सूचना वनविभागाला देण्यात आली होती मात्र वनविभाग वाघ पकडण्यास असमर्थ ठरत आहे. वाघ पकडण्याचे आदेशच नाही असे सांगून वाघाला पकडण्यास नकार दिला जात आहे. त्याबद्दल नागरिकांत वनविभागाबद्दल रोष वेक्त होत आहे.
तसेच आज सकाळी १० च्या सुमारास शेतकरी शेतात गेला असता त्याला वघाचे दर्शन झाले , वाघाच्या गळ्यात पट्टा बांधलेला असून या परिसरात वेगवेगळे वाघ निर्देशनास येत आहे त्यामुळे परिसरात ३ ते ४ वाघ असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे .नागरिकांनी क्षेत्रातील  लोकप्रतिनिधी कडे सुद्धा धाव घेऊन वाघाला पकडण्याची सूचना दिली  परंतु लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे, आपली समस्या जर लोकप्रतिनिधीसुद्धा सोडवु शकत नसेल तर आपण आता कोणाकडे धाव घ्यावी असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे . वाघाला पकडण्यास सरकार असमर्थ ठरत आहेत म्हणून वाघासोबत अनुचित घटना घडली तर त्यास सरकारच जबाबदार राहील असे नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. 
.

 



  Print






News - Chandrapur | Posted : 2019-04-16






Related Photos