महत्वाच्या बातम्या

 १ ते ३१ जुलै रोजी कौशल्य मागणी मोहिमेचे आयोजन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखड्याच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असतो. त्याकरिता राज्यातील युवक- युवतींचा कल जाणून घेऊन त्यांना मागणीवर आधारित कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी कौशल्य मागणी सर्वेक्षण मोहिमेचे १ ते ३१ जुलैदरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक भागातील तळागळातील युवक-युवतीमार्फत कौशल्य मागणीवर आधारीत कोर्सेसची निवड होणे अपेक्षित आहे. जेणेकरुन जिल्हा कार्यालयामार्फत उमेदवारांच्या मागणीनुसार व आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे शक्य होईल. याकरिता स्टुडन्ट स्किल नीड अससेसमेंट गूगल फॉर्म लिंक :- https://forms.gie/kYiSxbVhrZ2s9z६१८ ही गुगल लिंक तयार करण्यात आलेली आहे. तरी या लिंकचा वापर करुन जास्तीत जास्त युवक- युवतींनी आवडीच्या क्षेत्राबाबत माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणासाठी गुगल लिंक फॉर्म तयार करण्यात आला असून तो गुगल फॉर्म लिंक केला आहे. उमेदवारांची  स्टुडन्ट स्किल https://forms.gle/kYtSxbVhrZ२७६८ या लिंकवर उमेदवारांनी या नोंदणी करुन अर्ज भरावा.





  Print






News - Nagpur




Related Photos