वर्ल्डकप साठी आज मुंबईत संघनिवड


वृत्तसंस्था / मुंबई :    इंग्लंडमध्ये ३० मेपासून रंगणाऱ्या आगामी वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड आज सोमवारी  मुंबईत केली जाणार आहे. 
  बीसीसीआयच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की,  दुपारी तीनच्या सुमारास वर्ल्डकपच्या संघाची घोषणा होईल. गेले वर्षभर आमचे संघबांधणीसाठी प्रयत्न सुरू असून आता टीम इंडियातील फक्त एकच जागा भरायची राहिली आहे, असे भारताचा कर्णधार विराटने घरच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आटोपली तेव्हा सांगितले होते. तसे असले तरी एका मुद्यावर हमखास चर्चा होईल अन् ती म्हणजे, अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत इंग्लंड ला  जाईल की दिनेश कार्तिक. 

असा असू शकेल संघ 

--  स्थान निश्चित समजले जाणारे १४ खेळाडू: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंड्या, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा. 

- - १५व्या खेळाडूसाठी पर्याय 

दुसरा यष्टीरक्षकः दिनेश कार्तिक/ऋषभ पंत 

-- चौथ्या क्रमांकासाठी तज्ज्ञ फलंदाज हवा असल्यासः अम्बटी रायुडू. 

- - चौथा तेज गोलंदाजः उमेश यादव/खलील अहमद/इशांत शर्मा/नवदीप सैनी.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-15


Related Photos