दीड लाखांच्या लाचप्रकरणी खरपुंडी येथील सरपंच, उपसरपंच आणि सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


-  गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
एका संस्थेला शैक्षणिक प्रयोजनार्थ भोगवटा मुल्य भरून ग्रामपंचायत अंतर्गत जागा मंजूरीचा ठराव करून देण्याच्या कामासाठी प्रत्येकी ५०  हजार रूपयांप्रमाणे दीड लाखांची लाच मागणारे तालुक्यातील खरपुंडी येथील सरपंच, उपसरपंच आणि प्रभारी सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 
सरपंच आनंदराव दादाजी नैताम (४५) , उपसरपंच कमलेश अशोक खोब्रागडे (२९) आणि दिभना ग्रामपंचायतीच्या सचिव आणि खरपुंडी ग्रामपंचायतीचा प्रभार असलेल्या अर्चना बाळासाहेब श्रीगिरवार (४५)  रा. चामोर्शी रोड गडचिरोली अशी सापळ्यात अडकलेल्यांची नावे आहेत. दीड लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तक्रारदाराने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. काल ७ एप्रिल रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी  पडताळणी केली. यानंतर आज ८ एप्रिल रोजी सापळा कारवाई आयोजित केली. दरम्यान ग्रामसेविकेने ४०  हजार, सरपंच ५०  हजार आणि उपसरपंच ३०  हजार रूपये याप्रमाणे पंचासमक्ष पैशांची मागणी केली. लाच रक्कमेचा पहिला हप्ता ९०  हजार रूपये घेण्याचे ठरले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८  (संशोधनअधिनियम २०१८ ) अन्वये गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सादर कारवाई ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र,नागपूर चे पोलीस अधिक्षक  श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्लवार  , पोलीस उपअधिक्षक  विजय माहुलकर,  चंद्रपूर चे  पोलीस उपअधिक्षक  ज्ञानदेव घुगे  यांच्या मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक रवि राजुलवार, सफौ मोरेश्वर लाकडे, पोलीस  हवालदार  प्रमोद ढोरे, पो हवा नत्थू धोटे,  नापोशी सतिश कत्तीवार,  सुधाकर दंडिकेवार,  देवेंद्र लोणबळे, पोशी महेश कुकुडकार,गणेश वासेकर, किशोर ठाकुर, सोनल आत्राम, सोनी तावाडे, चानापोशी तुळशीराम नवघरे, चापोशी स्वप्निल वडेट्टीवार यांनी केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos