सोन्याच्या भावामध्ये घसरण, महिनाभरात सोन्याचे भाव प्रती तोळा दोन हजार रुपयांनी झाले कमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्याने सोन्याच्या भावामध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. महिनाभरात सोन्याचे भाव प्रती तोळा दोन हजार रुपयांनी कमी होऊन ते ३४ हजारांवरून ३२ हजारांवर आले आहेत. चांदीचे भाव ४१ हजार ५०० रुपयांवरून ते ३९ हजारांवर आले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाल्याने तसेच सोन्याच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक वाढत असल्याने हा परिणाम झाला असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. गेल्या महिन्यात ७२ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे दर ६९.०२ रुपयांवर आले. २६ फेब्रुवारी रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ्यावर पोहचले होते. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ते ३३ हजारांवर आले. ९ मार्च रोजी ३२ हजार ८०० रुपयांवर आले. तेव्हापासून दररोज भाव कमी होत आहेत. तीन दिवस सोने ३२ हजारांवर कायम राहिले व २ एप्रिलला ३०० रुपयांनी वाढ होऊन ३२ हजार ३०० रुपये प्रती तोळा झाले.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-03


Related Photos