महत्वाच्या बातम्या

 सेतू केंद्र चालकाने एक रुपया व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारु नये : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्ग प्रधानमंत्री पीक विमायोजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शिबीराचे आयोजन नुकतेच काटोल येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, सेतू केंद्रात करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांचे हस्ते शेतकऱ्यांना विमा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी सेतू केंद्र चालकाने एक रुपया व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारण्याबाबत सक्त निर्देश त्यांनी दिले.

या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी विक्रम भवरी व कुणाल ठाकूर, मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र चौधरी, कृषी पर्यवेक्षक बांबल आणि सेतू केंद्र चालक रितेश भारसकरे, यशोहरी कॅफे, काटोल तसेच शिबीरामध्ये विमा काढण्यासाठी आलेले तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos