महत्वाच्या बातम्या

 विविध महामंडळाच्या कर्ज विषयक योजनांची माहिती


- या विषयावर ऑनलाईन वेबीनारद्वारे मार्गदर्शन सत्र संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील नवउद्योजक तसेच स्वत:चा नवीन व्यवसाय/उद्योग सुरू करण्याची इच्छा बाळगणाऱ्या युवक व युवतींसाठी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या जिल्हा कार्यालयामार्फत १२ जुलै २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता विविध महामंडळाच्या कर्ज विषयक योजनांची माहिती या विषयावर ऑनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले.

सदर वेबीनारमध्ये प्रमूख मार्गदर्शक म्हणून १. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित भंडारा येथील जिल्हा समन्वयक माननीय श्री सिद्धार्थ खोब्रागडे सर, २. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित भंडारा येथील जिल्हा समन्वयक कल्पना भंगाळे, ३. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित भंडारा येथील जिल्हा समन्वयक माननीय सुहास बोंदरे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील सुधाकर झळके सहायक आयुक्त, भाऊराव निंबार्ते, क. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सोनू उके, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, मीरा मांजरेकर, महात्मा गांधी नॅशनल फेलो तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी वृंद हे उपस्थित होते. सदर वेबीनारमध्ये जिल्हयातील एकूण ५६ युवक व युवतींनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली होती.

सदर वेबिनार मध्ये सिद्धार्थ खोब्रागडे, कल्पना भंगाळे  आणि सुहास बोंदरे यांनी त्यांचे महामंडळाअंतर्गत कोणत्या कर्ज योजना राबविल्या जातात, लाभार्थी कोण असतात, कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, लाभाचे स्वरूप कसे असते, प्रस्ताव, अर्ज कोठे करावेत इ. बाबत उपस्थित युवक व युवतींना सविस्तर व उपयुक्त मार्गदर्शन केले. तसेच, सदर योजना या लाभार्थ्यांना माहिती नसल्यामुळे लाभार्थी त्यापासून वंचित असतात. त्यासाठी उमेदवारांनी महामंडळाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सदर योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले आहे.

तसेच, सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. उमेदवारांनी विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची सविस्तर माहिती घेऊन स्वत:चा व्यवसाय / उद्योग सुरू करता येईल. याबाबत उपस्थित युवक व युवतींना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सदर वेबीनारच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.





  Print






News - Bhandara




Related Photos