महत्वाच्या बातम्या

 कुनोमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू : पाच महिन्यांत सात चित्ते मृत्युमुखी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मध्ये प्रदेश : मध्ये प्रदेशमधील कुनो अभयारण्यातल्या तेजस या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. तेजसपूर्वी तीन चित्ते आणि तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या पाच महिन्यांत हा सातवा चित्ता मरण पावला आहे.

कुनो अभयारण्यात गस्तीवर असणाऱ्या पथकाला मंगळवारी सकाळी तेजस जखमी अवस्थेत सापडला होता. त्याच्या गळ्याच्या वरच्या भागात जखमा झालेल्या आढळून आल्या होत्या. त्याला त्वरित उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र, दुपारी २ च्या सुमारास तेजसने अखेरचा श्वास घेतला.

या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या असाव्यात, याचा शोध घेण्यासाठी तेजसचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी मोठा गाजावाजा करत आफ्रिका खंडातील नामेबिया येथून काही चित्ते हिंदुस्थानमध्ये आणण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून हे चित्ते हिंदुस्थानात आणण्यात आले होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांत त्यातील सात चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.





  Print






News - World




Related Photos