महत्वाच्या बातम्या

 भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा गोंडपिपरीत सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची राजूरा विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांच्या गोंडपिपरी येथे त्यांच्या सत्कार करण्यात आला.

राजूरा विधानसभेतील गोंडपिपरी मंडळ तालुक्याची बुथ सशक्तिकरण अभियान व अन्य संघटनात्मक रचनांच्या आढाव्या संदर्भात गोंडपिपरी भाजपा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला अध्यक्षस्थानी देवराव भोंगळे उपस्थित होते.

भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची राजूरा विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून नुकतीच निवड करण्यात आली.यानंतर १ जुलै २०२३ शनिवार रोजी भाजपच्या बैठकीच्या निमित्ताने गोंडपिपरीत आले. यावेळी तालुका भाजपच्या वतीने देवराव भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे, कार्याध्यक्ष साईनाथ माष्टे, माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार, स्वाती वडपल्लीवार, बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धूडसे, उपसभापती स्वप्निल अनमुलवार, दिपक बोनगिरवार, महिला तालुकाध्यक्ष सुरेखा श्रिकोंडावार आदिसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos