गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांसोबतच निवडणूका, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करणे गरजेचे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /  गडचिरोली 
:  येथील गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा ८ एप्रिलपासुन सुरू होत असुन ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात गडचिरोली-चिमुर व चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा क्षेत्राच्या निवडणुका होत आहेत.त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ आपल्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करते काय याकडे विद्यार्थ्यांचे  लक्ष लागले आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या  परीक्षा ८ एप्रिल पासुन सुरू होणार आहेत.मात्र विद्यापीठात समावेश असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील  लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी मतदान पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी पार पडणार आहे.निवडणुकीच्या काळात सर्वत्र प्रचार शिगेला पोहचणार आहे.त्यातच विद्यापीठाचे बहुतांश विद्यार्थी हे मतदार असल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपआपल्या गावी जावे लागणार आहे.त्याचप्रमाणे अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने आपल्या वेळापत्रकात बदल करण्याची गरज व्यक्त होत आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-11


Related Photos