महत्वाच्या बातम्या

 बार्टीचा ९० टक्के जास्त गुण मिळाल्याना २ लाख रुपये पुरस्कार : फेक एसएमएस 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : वर्ग १० वी मध्ये ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यासाठी २ वर्षासाठी प्रती वर्ष १ लाख अनुदान रक्कम असलेला एसएमएस समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे मात्र, सदर एसएमएस फेक असून याला कुणीही बळी पडून मनस्ताप ओढून घेऊ नये असे आवाहन केले आहे. 

नुकताच इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे त्याचा आधार घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांच्या नावाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना शैक्षणिक वर्ष मार्च २०२१ पासून लागू अश्या आशयासह बार्टीचा एसएमएस समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो १०० टक्के खोटा असून अनुसूचित जातीच्या विद्यार्थी व पालकांचा मनस्ताप वाढवणारा आहे साहजिकच असा एसएमएस दिसल्यावर पालक आणि विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात अडकले. असून याबाबत विदर्भ न्यूज एक्स्प्रेस ने सत्यता पडताळणी केले असता ही फेक एसएमएस आहे. इयत्ता दहावीत ९० टक्के गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना अशी कोणतीही पुरस्काराची रक्कम अनु. जातीतील विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याचे समोर आले आहे. सदर एसएमएस पूर्णतः खोटा असून त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी सजग राहण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos